Home राजकारण ⭕🙏 मोठा निर्णय, मोठा बदल! राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय ग्राम ते नगर...

⭕🙏 मोठा निर्णय, मोठा बदल! राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय ग्राम ते नगर विकासला नवीन दिशा🙏⭕

वरोरा : ✍️ अभिषेक भागडे

🙏 जय विदर्भ! 🙏

मुंबई | प्रतिनिधी | स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल
राज्याच्या विकास प्रक्रियेला गती देणारा आणि प्रशासन अधिक सक्षम करणारा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आज बुधवारी दि. 24 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आला. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व मा. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्राम, तालुका, जिल्हा तसेच नगर विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले.
🔴 ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासनाला बळकटी
जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे ग्रामस्तरावरील प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख होणार आहे.
🔴 आरोग्य सेवकांच्या नियुक्त्या नियमित
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेवकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
🔴 धाराशिव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी जागा
धाराशिव शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी दूधव्यवसाय विकास विभागाची 1 एकर जागा मंजूर करण्यात आली. सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक सन्मानाचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.
🔴 नगरपरिषद व नगरपंचायतींना स्वायत्तता
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना मताधिकार देण्यात येणार आहे. यासाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
🔴 विदर्भासाठी विकासाची नवी पहाट
या निर्णयांमुळे विदर्भातील ग्रामविकास, आरोग्य, नगरविकास आणि सामाजिक सन्मानाच्या प्रश्नांना गती मिळणार असून, जनतेतून सरकारच्या निर्णयांचे जोरदार स्वागत होत आहे.
📢 स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा
निर्भीड • आक्रमक • सत्याची बाजू
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
☎️ 9673574711
☎️ 8329889732
🙏 जय विदर्भ! 🙏