Home राजकारण ⭕🙏 मा. हंसराज भैय्या अहिर व आमदार करण दादा देवतळे यांच्या हस्ते...

⭕🙏 मा. हंसराज भैय्या अहिर व आमदार करण दादा देवतळे यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचे भव्य स्वागत करण्यात आले🙏⭕

🔶 वरोरा नगरपरिषदेत भाजपचा झंझावाती विजय
🔶 मा. हंसराजजी भैय्या अहीर व आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार

वरोरा :{ अभिषेक भागडे }
सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत वरोरा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत आणि ऐतिहासिक विजय मिळवत शहराच्या राजकारणावर आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सर्व विजयी नगरसेवक व नगरसेविकांचा पूर्व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. हंसराजजी भैय्या अहीर आणि आमदार मा. श्री. करण देवतळे यांच्या शुभहस्ते भव्य स्वागत-सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भाजप पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भगव्या जल्लोषात न्हाऊन निघाला होता. “भाजप जिंदाबाद”, “वरोराचा विकास – भाजपचा विश्वास” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
सत्कारप्रसंगी बोलताना मा. हंसराजजी भैय्या अहीर यांनी सांगितले की, “वरोरातील जनतेने भाजपवर जो ठाम विश्वास व्यक्त केला आहे, तो केवळ विजयापुरता मर्यादित नसून विकासाची जबाबदारीही आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही टीम करेल.”
आमदार करण देवतळे यांनीही विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत सांगितले की, “वरोराच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर भाजपचे नगरसेवक ठामपणे आणि प्रामाणिकपणे काम करतील.”
विजयी उमेदवारांनीही जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता नगराच्या विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि वरोराला प्रगत शहराच्या दिशेने नेण्यासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
🔹 वरोराच्या राजकारणात भाजपचा हा विजय म्हणजे विकासाची नांदी असून येणाऱ्या काळात शहराच्या बदललेल्या चित्राची साक्ष वरोरावासी अनुभवतील, हे निश्चित!