⭕🙏 पिंपळगाव (मा ) येथे वन शहीद स्मृति मनाचे भूमिपूजन संपन्न 🙏⭕

वरोरा: अभिषेक भागडे पिंपळगाव (मारोती) येथे वनशहीद स्मृती वनाचे भूमिपूजन संपन्न!

देशसेवा व पर्यावरण रक्षणाच्या पवित्र भावनेतून उभारण्यात येणाऱ्या वनशहीद स्मृती वन या प्रेरणादायी उपक्रमाचे भूमिपूजन पिंपळगाव (मारोती) येथे मोठ्या भावनिक वातावरणात पार पडले. या स्मृतीवनाचे भूमिपूजन मा. श्री. हंसराजजी भैय्या अहीर यांच्या शुभहस्ते, तर मा. आमदार श्री. करणदादा संजयजी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

हे स्मृतीवन देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान नाईक अक्षय दिगांबर निकुरे यांच्या पावन स्मरणार्थ उभारण्यात येत असून, त्यांच्या शौर्याला व त्यागाला शाश्वत वंदन ठरणार आहे. या उपक्रमातून केवळ शहीद जवानांच्या स्मृती जपल्या जाणार नाहीत, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेशही समाजात रुजविला जाणार आहे.

कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी वनशहीदांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करत, अशा स्मृतीवनांच्या माध्यमातून पुढील पिढीला देशप्रेम, कर्तव्यभावना व निसर्गरक्षणाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती.

वनशहीद स्मृती वन हे केवळ वृक्षारोपणाचे ठिकाण नसून, देशसेवेचा आदर्श आणि पर्यावरण जतनाची चळवळ म्हणून ओळख निर्माण करेल, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. —🙏जय विदर्भ🙏—{ बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️ 9673574711☎️ 8329889732