⭕🙏 गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ !🙏⭕

गावकऱ्यांच्या जिवाशी खेळ !

गावातून धावणाऱ्या जड वाहनांनी दहशत; तात्काळ बंदीची मागणी

भद्रावती : ✍️ अभिषेक भागडे 👇👇👇👇

भद्रावती तालुक्यातील गावकरी परिसरातून सुरू असलेली जड वाहनांची बेफाम वाहतूक ही थेट गावकऱ्यांच्या जिवाशी खेळणारी ठरत आहे. सिमेंट, खडी, मुरूम वाहून नेणारी अवजड वाहने दिवसरात्र गावातून धावत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती तीव्र झाली आहे.

गावातील अरुंद रस्त्यांवरून भरधाव जाणाऱ्या ट्रक व डंपरमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अक्षरशः मृत्यूच्या सावलीत वावरत आहेत. शाळेत जाणारी मुले, कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक कायम धास्तीत असून, कधी मोठी दुर्घटना घडेल याचा नेम नाही.

या जड वाहनांमुळे रस्ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून धूळ, धूर व प्रचंड आवाजामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ व मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) यांना निवेदन दिले आहे. त्या वेळी  सौ.संरक्षिता निरंजने तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व 1) प्रफुल शेडमाके,2) लालाजी साव, 3) मंगेश जुनाके, 4) ज्योती शेडमाके 5) बादल आलोने, 6)वंदना दुर्वे,7) मनोहर तलांडे, 8) प्रवीण मेश्राम, 9) विजय गायकवाड, 10) सुनील जुनघरे, 11) आशिष नगराडे, 12) सुजाता चिवंडे, 13) पत्रू  गेडाम,14)रामवती ताई,  इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते व गावातील ज्येष्ठ नागरिक व समस्त गावकरी उपस्थित होते.गावातून जाणारी जड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. पर्यायी बायपास मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा भविष्यातील दुर्घटनांसाठी प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

गावकऱ्यांच्या जीवापेक्षा वाहतुकीला अधिक महत्त्व दिले जात आहे का? असा सवाल उपस्थित होत असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

—🙏 जय विदर्भ 🙏— { बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 }