⭕🙏 मुर्सा सेवा सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न🙏⭕

 

 

 

✍️ अभिषेक भागडे
भद्रावती | जि. चंद्रपूर

ता. भद्रावती अंतर्गत येणाऱ्या मुर्सा येथील मुर्सा सेवा सहकारी संस्था मर्या. (र. न. ३६८) यांच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील सहकार चळवळीला बळ देणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.

या नूतन इमारतीचे उद्घाटन वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूरचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी शिंदे हे उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी सहकार क्षेत्राच्या मजबुतीसाठी सेवा सहकारी संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी व सभासदांना पारदर्शक, जलद आणि सक्षम सेवा देण्यासाठी आधुनिक इमारत उपयुक्त ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

🙏मान्यवरांची उपस्थिती🙏

या सोहळ्यास राजेंद्रभाऊ डोंगे, श्यामसुंदरजी उरकुडे, नितेश नांदे, विनोद पोले, स्नेहलताई नांदे, किशोरजी बावणे, शंकरजी कोहळे, सुधाकर नांदे, बळीरामजी रोडे, विलासराव घोटकर, नानाजी घोटकर, अश्विनीताई हुलके, प्रभाकरजी लोढे, भाऊरावजी नांदे, बोबडेजी, विनोदजी घुगल, कानोबाजी तिखट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, संस्था पदाधिकारी, कर्मचारी व मुर्सा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाला नवी दिशा

नूतन इमारतीमुळे संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होणार असून शेतकरी, कर्जदार व सभासदांना एका छताखाली विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे सहकार क्षेत्र अधिक सक्षम होऊन मुर्सा गावाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

 

🙏 जय विदर्भ 🙏

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
☎️ 9673574711
☎️ 8329889732