अभिमानाचा क्षण!
“अम्मा की पढाई” उपक्रमातील विद्यार्थ्याची MPSC मार्फत राज्य कर निरीक्षक (STI) पदी निवड
चंद्रपूर :✍️ अभिषेक भागडे
चंद्रपूर शहरासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली आहे. आपल्या पुढाकारातून सुरू असलेल्या “अम्मा की पढाई” या शिक्षण केंद्रातील विद्यार्थी श्री. सचिन रामदास लाकडे यांनी MPSC परीक्षेत यश संपादन करून राज्य कर निरीक्षक (STI) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. हे यश केवळ वैयक्तिक नसून समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सचिन लाकडे व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमादरम्यान सचिन यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सचिन लाकडे यांचे हे यश गरजू व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. “अम्मा की पढाई” या सामाजिक उपक्रमातून अनेक विद्यार्थी घडत असून, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळत असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थी सातत्याने यश संपादन करत आहेत, ही बाब समाजासाठी आशादायी असून भविष्यातही अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
सचिन रामदास लाकडे यांना त्यांच्या या यशाबद्दल जय विदर्भ तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
—🙏जय विदर्भ ––🙏 { बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
☎️ 9673574711
☎️ 8329889732}




