शैक्षणिक विकासाला चालना; ₹२ कोटी ३५ लाखांच्या कामाला सुरुवात
खेमजई (ता. वरोरा) : ✍️ अभिषेक भागडे
ग्रामपंचायत खेमजई व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खेमजई यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा इमारत बांधकाम या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. जिल्हा वार्षिक योजना २०२५–२६ अंतर्गत सुमारे ₹२ कोटी ३५ लाख खर्चाच्या या भव्य शाळा इमारतीच्या बांधकामामुळे खेमजई व परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या विकासकामाचे भूमिपूजन वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. करणदादा संजय देवतळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. मनीषाताई चौधरी, सरपंच, ग्रामपंचायत खेमजई या उपस्थित होत्या.
याप्रसंगी मा. श्री. चंद्रहासजी मोरे उपसरपंच. मा. डॉ. गंपावरजी साहेब, सामाजिक कार्यकर्ते. मा. श्री. नरेशकुमारजी जयस्वाल (सामाजिक कार्यकर्ता, वरोरा), मा. श्री. धिरजजी दारुडे (टेमुर्डा), मा. सौ. चेतनाताई मुन (मुख्याध्यापिका, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, खेमजई), श्री. येनचलवार (ग्रामसेवक) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मा. करणभाऊ देवतळे साहेब यांनी सांगितले की, “शिक्षण हा विकासाचा पाया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. खेमजई येथील ही नवीन शाळा इमारत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल.”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत शासनाच्या शैक्षणिक धोरणाचे कौतुक केले. नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, प्रशस्त व आधुनिक शिक्षण वातावरण मिळणार असून गावाच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच गती मिळणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप ग्रामस्थांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
देवतळेंवर विश्वास जुना, विकासात वेग पुन्हा!
—🙏जय विदर्भ 🙏—
📢 जाहिराती व बातमीसाठी संपर्क:
☎️ 9673574711
☎️ 8329889732




