राज्यस्तरीय उपवर–उपवधू परिचय मेळावा व स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न
नागपूर | अभिषेक भागडे
खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय उपवर–उपवधू परिचय मेळावा व स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे समाजातील नातेसंबंध दृढ होण्यास हातभार लागला असून युवक-युवतींसाठी एक सकारात्मक व मार्गदर्शक व्यासपीठ उपलब्ध झाले.
या कार्यक्रमाला नागपूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार मा. मोहनजी मत्ते तसेच वरोरा–भद्रावती मतदारसंघाचे आमदार मा. करणदादा देवतळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजातील एकोपा, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
मेळाव्यात राज्याच्या विविध भागातून आलेले उपवर–उपवधू, त्यांचे पालक, समाजातील ज्येष्ठ मंडळी, युवक-युवती व खैरे कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्नेह मिलनाच्या माध्यमातून आपुलकीचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील एकात्मता अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
समाजहितासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम नातेसंबंध दृढ करणारा, सकारात्मक विचारांना चालना देणारा आणि समाजाच्या प्रगतीस दिशा देणारा ठरला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल खैरे कुणबी समाज सुधारक संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—🙏जय विदर्भ 🙏–– { बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
☎️9673574711 ☎️8329889732 }




