⭕🙏 पाटाळा येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन🙏⭕

भद्रावती : ✍️अभिषेक भागडे

पाटाळा येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या उद्घाटन

पाटाळा (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) :
जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या वतीने गावामध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

या कबड्डी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. हसराजी भैय्या अहिर, अध्यक्ष – केंद्रीय आदिवासी आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन मा. श्री. करणदादा देवतळे, आमदार, वरोरा–भद्रावती विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून
मा. श्री. रमेश जी राजुरकर निवडणूक प्रमुख, विधानसभा क्षेत्र व राज्य परिषद सदस्य, भाजपा महाराष्ट्र,
मा. श्री. रविंद्रजी शिंदे, अध्यक्ष – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
मा. श्री. उमेशभाऊ बोरेकर, जिल्हाध्यक्ष – कामगार मोर्चा, भाजपा, चंद्रपूर तथा माजी लोकसभा संयोजक,
मा. सौ. अमृताताई सुर, जिल्हाध्यक्ष – कामगार मोर्चा महिला आघाडी,
यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय मा. श्री. अमितकुमार पांडे, ठाणेदार साहेब, माजरी,
मा. श्री. रवींद्र जी धोटे, कुचना,
मा. श्री. सुशील घायवन, राळेगाव,
मा. श्री. विजेंद्र वानखडे, सरपंच – पाटाळा,
मा. सौ. विद्या प्रमोद आवारी, उपसरपंच – पाटाळा/राळेगाव,
तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कबड्डी स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात आपली कला दाखवण्याची संधी मिळणार असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ तसेच समस्त ग्रामवासी पाटाळा यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
अध्यक्ष – श्री. आदित्य पुंड,
उपाध्यक्ष – श्री. निखिल बोरे,
सचिव – श्री. शुभम डोंगरे,
तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत आहेत. तरी समस्त गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. —🙏जय विदर्भ🙏—{ बातमी आणि जाहिराती करिता संपर्क साधा. ☎️ 9673574711☎️ 8329889732}