⭕🙏 आनंद निकेतन महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी 🙏⭕

🌟 आनंदनिकेतन महाविद्यालयाची झोपाळू कामगिरी!
राज्यस्तरीय कराटे व एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय पातळीवर दोघींनी मिळवली धडाकेबाज एन्ट्री
— स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा

वरोरा :✍️ अभिषेक भागडे

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर उत्तुंग झेप घेत महाविद्यालयाचा मान अभिमानाने उंचावला आहे. पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या कराटे स्पर्धेमध्ये वाणिज्य शाखेची बारावीची विद्यार्थिनी वेदिका गुणवंत भोयर हिने ६४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या अप्रतिम कामगिरीमुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली असून ती आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

याचबरोबर, बालेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी वनिता पुंगाटी हिने 5 किमी वॉकिंग स्पर्धेत जबरदस्त वेग व तडफदार खेळी दाखवत सुवर्णपदक पटकावले. तिचेही राष्ट्रीय पातळीवरील स्थान पक्के झाले असून ती आता देशभरातील खेळाडूंशी स्पर्धा करणार आहे.

🏅 दोन सुवर्णपदके — दोन राष्ट्रीय निवडी!
आनंद निकेतनची क्रीडा क्षेत्रातील सुवर्णपानावर नोंद

या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर, प्रा. सचिन साळुंखे, तुषार पारखी तसेच सर्व प्राध्यापक वृंदांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाकडून क्रीडा क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या उत्तुंग प्रोत्साहनाचे हे फलित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

🟦 महारोगी सेवा समितीचे अभिनंदन
या उल्लेखनीय यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजणे तसेच सर्व विश्वस्तांनी दोन्ही विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेच्या सर्वंकष सहकार्यामुळे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर झेप घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या दोन्ही उदयोन्मुख खेळाडूंनी मिळवलेले हे दुहेरी राज्यस्तरीय यश महाविद्यालयासाठी आणि वरोरा परिसरासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.
—🙏 जय विदर्भ 🙏—{ बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा.☎️ 9673574711 ☎️ 8329889732 }