वरोरा : ✍️ (अभिषेक भागडे)
हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५ उत्साहात पार

हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कला, खेळाडूपणा आणि सर्जनशील प्रतिभेला मंच मिळावा या उद्देशाने दरवर्षी घेण्यात येणारा हा महोत्सव शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा उत्कृष्ट नमुना ठरला.

महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या जोश, उर्मी, सादरीकरणांतील आत्मविश्वास आणि क्रीडा स्पर्धांमधील कौशल्यपूर्ण कामगिरी पाहण्याचा आनंद उपस्थित मान्यवरांना लाभला. शाळेच्या प्रगतीत आपला मोलाचा वाटा उचलणारे सर्व पाहुणे, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच संस्मरणीय बनला.

या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून भद्रावती वरोरा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण दादा देवतळे व डोंगरे सर (मुख्याध्यापक), कृष्णकांतजी लोया, रामबाबूजी लोया, श्यामबाबूजी लोया, राखे सर (प्राचार्य, लोकमान्य विद्यालय), पवार सर, आंबटकर मॅडम, राजूभाऊ चिकटे, नागोसे सर, मेश्राम सर तसेच इतर शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजवंदन, मार्च-पास्ट आणि विविध खेळांचे उद्घाटन सोहळे पार पडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगतदार सांस्कृतिक नृत्याविष्कार, गीत-वादन, पारंपरिक सादरीकरणे यांचेद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली. क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, संघभावना आणि मैदानावरील उत्कृष्ट कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली.

शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते, ही परंपरा वर्षानुवर्षे कायम राखल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शिक्षकवर्गाची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे हा महोत्सव यशस्वी ठरला.

समारोप प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

—🙏 जय विदर्भ 🙏—

📞 बातमी आणि जाहिरातींसाठी संपर्क :
☎️ 9673574711
☎️ 8329889732