✍️ अभिषेक भागडे वरोरा =खांबाडा येथे परमेश्वर विहिरी सद्गुरू जगन्नाथ बाबा दिंडी सोहळा व पंचमी वर्धापनदिन महोत्सवाला उत्साही प्रतिसाद
खांबाडा येथील श्री जगन्नाथ बाबा मठ येथे परमेश्वर विहिरी सद्गुरू जगन्नाथ बाबा यांच्या दिंडी सोहळा व पंचमी वर्धापनदिन पंचदिवसीय महोत्सवाचे भक्तिमय आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक महोत्सवातील नामसंकीर्तन सोहळा व महाप्रसाद यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या विशेष सोहळ्याची सुरुवात सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी होत असून, विविध धार्मिक कार्यक्रमांनी सजलेला हा भक्तीमय उत्सव शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी समारोपास येणार आहे.
महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी हरिनाम संकीर्तन, प्रवचन, भजने, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन असून, भक्तांना अध्यात्मिक ऊर्जेचा अमूल्य अनुभव देणारा हा सोहळा ठरणार आहे. कार्यक्रमात सहभागी होऊन सद्गुरूंच्या कृपेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजक:
🔸 श्री शंकरराव सा. भोंयर, अध्यक्ष
🔸 श्री कडुबाजी एल. झाडे, उपाध्यक्ष
🔸 श्री जनार्दन प. भोंयर, पूर्व संचालक
🔸 श्री मधुकरराव सा. भोंयर, सचिव
सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनम्र विनंती करण्यात आली आहे.
🙏 हरिनाम संकीर्तनाचा दिव्य आनंद लुटण्यासाठी आपण नक्की उपस्थित राहा! —🙏 जय विदर्भ 🙏— ( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 )




