⭕🙏 श्रीराम जन्मभूमी परिसरात जल्लोषात ध्वजावंदन 🙏⭕🙏

✍️ अभिषेक भागडे

**धर्मध्वजाने भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाला मिळाली नवी दिशा

श्री राम जन्मभूमी परिसरात जल्लोषात ध्वजवंदन**

अयोध्या – भारतीय संस्कृती, सभ्यता आणि अध्यात्मिक परंपरेचे प्रतीक ठरलेल्या धर्मध्वजाचे आज श्री राम जन्मभूमी येथे भव्य अनावरण करण्यात आले. हा धर्मध्वज केवळ एक ध्वज राहिला नसून, भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा आणि रामराज्याच्या आदर्शांचा दीपस्तंभ म्हणून उभा राहिला आहे.

धर्मध्वजाचा भगवा रंग त्याग, शौर्य आणि आध्यात्मिक तेजाचे प्रतीक मानला जातो. या ध्वजावर सूर्यवंशाची कीर्ती, पवित्र ॐ चिन्ह आणि कोविदार वृक्षाचे अंकन — या तिन्ही गोष्टी प्रभू श्रीरामांच्या दिव्य परंपरेची महती अधिक उजळवतात.

ध्वजाच्या फडकण्यात रामराज्याच्या आदर्शांचे, लोककल्याणाच्या संकल्पांचे आणि धर्मनिष्ठ जीवनपद्धतीचे सामर्थ्य प्रतिबिंबित होते. उपस्थित भाविकांनी “सियावर रामचंद्र की जय” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

श्री राम जन्मभूमी येथे होणाऱ्या या नव्या अध्यायामुळे देशभरात सांस्कृतिक पुनर्जागरणाला नवी प्रेरणा मिळाल्याचे भावना व्यक्त केल्या जात आहेत. धर्म, संस्कृती आणि परंपरेची उभी राहिलेली ही भव्य निशाणी आगामी पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️8329889732☎️9673574711 )
—🙏 जय विदर्भ 🙏—