⭕🙏सौ. मायाताई रमेश राजुरकर : वरोरा नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी योग्य, समक्ष आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख उमेदवार 🙏⭕

 

वरोरा✍️( अभिषेक भागडे ) : वरोरा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला राखीव गटातून उमेदवारी करणाऱ्या सौ. मायाताई रमेश राजूरकर या शिक्षण, समाजकार्य, नेतृत्व आणि प्रामाणिक सेवाभाव यांचे सुंदर मिश्रण असलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे आज वरोरातील जनमानसात विशेष श्रद्धा आणि विश्वासाने पाहिल्या जातात.

त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणाची जिद्द आणि ज्ञानाची तळमळ यामुळे त्यांनी एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. हिंदी, पीएच.डी. हिंदी अशी उच्च पदवी संपादन केली. तब्बल २४ वर्षे हिरालाल लोया विद्यालय, वरोरा येथे अध्यापिका म्हणून त्यांनी कर्तव्यनिष्ठेने काम केले. काही वर्षे सेवा बाकी असतानाच समाजाच्या सेवेसाठी स्वतःहून नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी समाजकार्यात स्वतःला अर्पण केले—हेच त्यांच्या निस्वार्थी वृत्तीचे सर्वांत मोठे उदाहरण आहे.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठ, दिल्ली यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले आहे. मागील पंधरा वर्षांहून अधिक काळ त्या प्राधिकरण विधी समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत असून अनेक लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत.

तालुका धनोजे कुणबी समाज महिला आघाडीच्या त्या संस्थापक आणि माजी अध्यक्ष आहेत. त्याचसोबत—

कार्यकारी सदस्य – विवेकानंद कॉन्व्हेंट

उपाध्यक्ष – जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था, वरोरा

डायरेक्टर – टाइनी मिनरल्स, प्राइवेट लिमिटेड नागपूर

कोषाध्यक्ष – इनरव्हील क्लब, वरोरा

सदस्य – साईनाथ पतसंस्था

या विविध सामाजिक संस्था, संघटना व मंचांमध्ये त्यांनी कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

त्यांचे पती श्री. रमेशराव राजूरकर हे इंजिनियर असून सरकारी नोकरी सोडून उद्योग क्षेत्रात प्रगती करत असतानाच समाजकार्यातही ते अग्रस्थानी आहेत. ते भाजपा राज्य परिषद सदस्य असून वरोरा–भद्रावती परिसरातील विविध गटांमध्ये ते सक्रियपणे काम करतात. महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांचे प्रशिक्षण, लाडली बहिण योजना मार्गदर्शन, स्वच्छ पाणी उपक्रम, पाणी आडवा–पाणी जिरवा मोहिम, बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, स्वयंरोजगार कार्यशाळा अशा असंख्य उपक्रमांमध्ये सौ. मायाताईंचा पूर्ण सहभाग राहिला आहे.

सौ. मायाताई राजूरकर या उच्च शिक्षण, संस्कार, कार्यक्षमता आणि सामाजिक भान असलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे वरोरा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी योग्य, सक्षम आणि जनआकांक्षा जाणणाऱ्या उमेदवार आहेत.

आगामी वरोरा नगरपरिषद निवडणुकीत —
सौ. मायाताई रमेश राजूरकर यांना आपले मौल्यवान मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करून वरोराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर करावा, ही नम्र विनंती.

🙏  मनोहर स्वामी 🙏                                                                                                                                               ( ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक  ज्येष्ठ कार्यकर्ते )                 —🙏 जय विदर्भ 🙏—                                                                                   ( बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️8329889732 )