वरोरा:✍️ ( अभिषेक भागडे ) तालुक्यात पुरबुडाई व सोयाबीन नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा तहसीलदारांना निवेदन
वरोरा, ता. वरोरा
तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि नाल्यालगतच्या क्षेत्रातील पुरबुडाईमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीन पिकाचे जवळपास शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या पुरबुडाई, सोयाबीन नुकसानभरपाई तसेच रब्बी हंगामातील बियाणे अनुदानाबाबत अजूनही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी हितचिंतक श्री. किशोर म. डुकरे, शेतकरी पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते, यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मा. तहसीलदार, वरोरा यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनात डोंगरगाव आणि डाहाळा रिठ परिसरातील फक्त 25% शेतकऱ्यांना तुटपुंजे अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा उल्लेख आहे.
श्री. डुकरे यांनी केलेल्या चौकशीत डोंगरगाव येथील तलाठी शेतकऱ्यांशी उद्धट भाषेत वागतात, तसेच “तुम्हाला काय करायचे ते करून घ्या” अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य करतात, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई व अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनाची प्रत मा. उपविभागीय अधिकारी, वरोरा यांनाही पाठविण्यात आली असून शेतकरी वर्ग अपेक्षित न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे श्री. डुकरे यांनी सांगितले.
–🙏 जय विदर्भ🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 8329889732 )




