Home जिल्हा ⭕ भा.ज.पा.त प्रवेश ⭕

⭕ भा.ज.पा.त प्रवेश ⭕

कुकुडसाथ गावातील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात मोठ्या उत्साहात प्रवेश
लोककल्याणासाठी भाजपाचा दृढनिश्चय — आमदार देवराव भोंगळे

राजुरा( अभिषेक भागडे )✍️ : “सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे आणि विकासाची फळे तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच भाजपा सरकारचे प्रमुख ध्येय आहे,” असे प्रतिपादन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी आज (दि. २४) राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार भोंगळे मार्गदर्शन करत होते.

आमदार भोंगळे पुढे म्हणाले—
“देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा वेग सतत वाढत आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत सुविधांमध्ये गुणात्मक सुधारणा करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यास भाजपा सरकार कटिबद्ध आहे.”

भाजपात प्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये — स्वप्निल काकडे, रमेश ठोंबरे, विनोद उपरे, रवींद्र आस्कर, अविनाश उपरे, बाळा उपरे, चरण ताजणे, राहुल आस्कर, सुभाष आस्कर, जितेंद्र कुंभे, नवनाथ ताजणे, अविनाश ताजने, अमोल दरेकर, गणेश वडस्कर — यांचा समावेश आहे.

नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले की —
“भाजपा सरकारचे जनकल्याणकारी निर्णय, सर्वांना समान न्याय देणारी कार्यपद्धती आणि आमदार देवराव भोंगळे यांचे लोकाभिमुख नेतृत्व यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला.”

याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते यशवंत चवले, उपसरपंच गजानन आस्वले, सुरेश ताजने, रमेश उपरे, ग्रामीण महामंत्री सचिन बल्की, राजुरा शहर उपाध्यक्ष नितीन पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
—🙏 जय विदर्भ🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711☎️8329889732 )