📢 वरोरा पोलिसांची जलद कामगिरी — चोरीचा 2 तासांत पर्दाफाश! 🚓💰

वरोरा( अभिषेक भागडे ) : दि. 17/11/2025 रोजी वरोरा पोलीस स्टेशनने केवळ 2 तासांत चोरीचा गुन्हा उकलत उत्तम पोलिसिंगची चमकदार कामगिरी दाखवली आहे.

हनुमान वार्ड, वरोरा येथील फिर्यादी सुनील वासुदेवराव घाटे (वय 45) यांनी दुपारी यात्रा वार्ड येथील चिकन मार्केटजवळ बँकेतून काढलेली ₹1,40,000/- रक्कम त्यांच्या मोपेडच्या डीकीत ठेवली होती. दरम्यान ते जवळील एका हॉटेलमध्ये गेले असता, अज्ञात आरोपीने ही संपूर्ण रक्कम चोरून नेली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पो. स्टे. वरोरा येथे अप. क्र. 744/2025 कलम 303(2) भा. न्या.स. 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

🕵️‍♂️ तपासाची झपाट्याने सुरुवात
घटनेची माहिती मिळताच तपास पथक प्रमुख सपोनी शरद एस. भस्मे यांच्यासहित पोलीस कर्मचारी संदिप मुळे व विशाल राजुरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर संशयिताचा मागोवा घेऊन राजू लिगन्ना इंद्रपवार (रा. यात्रा वार्ड, वरोरा) यास ताब्यात घेण्यात आले.

▶️ चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पूर्ण ₹1,40,000/- रक्कम जप्त करण्यात आली आहे.

👮‍♂️ यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा श्री. संतोषजी बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्रभारी अधिकारी श्री. अजिंक्य तांबडे (सा.पो. स्टे. वरोरा) यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तपास पथकात :

सपोनी शरद भस्मे

पो. कर्मचारी संदिप मुळे

विशाल राजुरकर

यांचा विशेष सहभाग होता.

📌 व्यापारी वर्गाचीही महत्त्वपूर्ण मदत
या गुन्ह्याच्या उकलणीमध्ये व्यापारी संजय शेडे, अनीकेत पुरी, प्रमोद लोंडे, जयंत ठमके यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

वरोरा पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि कार्यक्षम तपास पद्धतीमुळे शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गातून कौतुकाची भावना व्यक्त केली जात आहे. 🚓👏 ( बातमी जाहिराती करिता संपर्क साधा.☎️9673574711☎️8329889732 )