**भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन

सदर कार्यक्रमासाठी उपस्थिती अनिवार्य**

वरोरा, प्रतिनिधी —✍️ (अभिषेक भागडे )

भारतीय जनता पक्ष, वरोरा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाबाबत पक्षाचे सर्व आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षातर्फे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, सदर कार्यक्रमात सर्वांनी आवर्जून आणि वेळेवर उपस्थित राहणे अत्यावश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी संघटनात्मक घडामोडी, निवडणूक तयारी, विभागीय आढावा तसेच पक्षवृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. त्यासाठी सर्व स्तरातील पदाधिकारी, विभागातील कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा आणि इतर सर्व आघाड्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

या शक्ती प्रदर्शना मुळे पक्षाच्या संघटक शक्तीला बळकटी मिळणार असून, आगामी राजकीय कार्यक्रमांच्या नियोजनाला वेग येणार आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेचे बळ वाढविण्यासाठी या शक्ती प्रदर्शना च्या  कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विनीत,
भारतीय जनता पक्ष, वरोरा
( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711☎️8329889732 )

—🙏 जय विदर्भ 🙏—