नागपूर( अभिषेक भागडे )📍आढावा बैठक – बीना व भानेगाव पुनर्वसन कार्याला वेग

नागपूर जिल्ह्यातील बीना आणि भानेगाव या गावांच्या पुनर्वसनासंदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मुख्यालय, नागपूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करून कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत पुनर्वसनाचा विद्यमान टप्पा, प्रलंबित कामे, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या, तसेच आवश्यक सुविधांची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा झाली. पुनर्वसन प्रकल्प वेळेत आणि सुलभ रीतीने पूर्ण करण्यासाठी समन्वय वाढवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या वेळी माझ्यासमवेत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जे. पी. द्विवेदी, एस.ई.सी.एल. चे स्वतंत्र संचालक ऍड. गजानन आसोले, भाजप नागपूर जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष सतीश वाडीभस्मे, बीना ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण भडंग, उपसरपंच हर्षवर्धन गजभिये, तसेच दिवाकर निखाडे, रामेश्वर ढोके, अरविंद गौरखेडे, धिरज नगरकर, नितीन मोहिते, श्यामराव सरोदे, अरविंद चिकणकर, प्रणय खवले आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित सर्वांनी पुनर्वसनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ( बातम्या आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 8329889732 )