⭕🪷 रोटरी क्लब वरोरा तर्फे रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन 2025🪷⭕
१३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान मनोरंजन व खाद्यपदार्थांची मेजवानी
वरोरा (ता. १० नोव्हेंबर):
रोटरी क्लब वरोरा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दिनांक १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वणी बायपास रोडवरील वानखेडे सेलेब्रेशन येथे पार पडणार असून, वरोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा उत्सव मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची आकर्षक मेजवानी ठरणार आहे.
या सहा दिवसीय उत्सवाचा उद्देश महिला सशक्तीकरण हाही असून, महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी मिळणार आहे.
उत्सवाचे उद्घाटन १३ नोव्हेंबर रोजी होणार असून, आनंदवनाचे कौस्तुभ विकास आमटे, पल्लवी आमटे, पोलीस विभागीय अधिकारी संतोष बाकल, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अक्षय लोहे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे.
कार्यक्रमांमध्ये दररोज वेगवेगळ्या आकर्षक सादरीकरणांचा समावेश असून,
१३ नोव्हेंबर – भव्य बॉलीवूड फॅशन शो
१४ नोव्हेंबर – रंगतदार लावणी स्पर्धा
१५ नोव्हेंबर – इंस्टाग्राम स्टार विलास झट्टे यांचा विशेष शो
१६ नोव्हेंबर – ‘पुष्पा अवतार’ प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार अजय मोहिते यांचा शो
अशी कार्यक्रमांची मालिका नागरिकांच्या मनोरंजनासाठी सादर केली जाणार आहे.
उत्सवात विदर्भातील सर्वात मोठा आकाश झुला, भव्य ॲम्युजमेंट पार्क, विविध दुचाकी–चारचाकी वाहनांचे प्रदर्शन, महिलांच्या आभूषणांचे व वस्त्रांचे स्टॉल्स, तसेच अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असतील.
विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, या उत्सवातून मिळणारा निधी समाजातील गरजू आणि होतकरू व्यक्तींच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, सचिव राहुल पावडे, कोषाध्यक्ष देवानंद गावंडे, आणि उत्सव समन्वयक अमित नाहर यांनी दिली.
पत्रकार परिषदेत रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ अभिषेक भागडे
—🙏 जय विदर्भ 🙏—( जाहिराती आणि बातम्या करिता संपर्क साधा. ☎️9673574711☎️8329889732)




