Home जिल्हा ⭕वरोरा भाजपाची निवडणूक आढावा बैठक संपन्न⭕

⭕वरोरा भाजपाची निवडणूक आढावा बैठक संपन्न⭕

ता. ९ नोव्हेंबर २०२५, वरोरा

🟠 वरोऱ्यात भाजपाची निवडणूक आढावा बैठक संपन्न

आमदार देवराव भोंगळे व आमदार करण दादा देवतळे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांशी संवाद

✍️ अभिषेक भागडे, वरोरा

राजुरा येथील आमदार तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अध्यक्ष मा. देवरावजी भोंगळे यांनी आज वरोरा येथील आमदार मा. करण दादा देवतळे यांच्या निवासस्थानी 13 प्रभागातील, नगरपरिषद निवडणूक २०२५ तथा नगराध्यक्ष पदा च्या संदर्भात इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीत आमदार भोंगळे यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत आगामी निवडणुकीची तयारी, प्रचार नियोजन, तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीस वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख श्री. रमेशजी राजुरकर, माजी नगराध्यक्ष विनोदजी लोकरे, नवनियुक्त शहराध्यक्ष संतोषजी पवार, माजी अध्यक्ष सुरेशजी महाजन, अमित चवले, किसनजी सुर, सुरज पोले, तसेच इतर कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी वरोरा शहरातील नगरपरिषदेच्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, आणि भावी निवडणुकीतील रणनीती या मुद्द्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

    • ( जाहिराती बातम्या संपर्क साधा, ☎️9673574711)
      —🙏🏻 जय विदर्भ🙏🏻—