📰 वरोऱ्याचा अमन लोया सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण — कौतुकाची लाट
वरोरा : येथील भारत शिक्षण संस्थेचे सचिव तथा व्यावसायिक कृष्णकांत लोया यांचा सुपुत्र अमन लोया याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.
अमनने हे यश कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्राप्त केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वरोऱ्यात सर्वत्र कौतुकाची लाट आहे.
आज डॉ. (सौ.) माया रमेश राजुरकर (सामाजिक कार्यकर्त्या) व श्री. रमेशजी राजुरकर यांनी अमन लोया याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमनचे यश वरोऱ्यासाठी अभिमानास्पद ठरत असून, त्याच्या प्रयत्नांमुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळत आहे.
—🙏 जय विदर्भ 🙏—( जाहिराती व बातम्या करता संपर्क साधा. मो.9673574711)




