🟠 वरोरा येथील प्रभाग क्रमांक-7 मधील,भाजपात नव्या कार्यकर्त्यांचा उत्साही प्रवेश 🟠
वरोरा : आज वरोरा येथील गोदावरी गौतम वानखेडे, श्री. गौतम वानखेडे, स्वाभिमान गौतम वानखेडे आणि अनिल शंभू सिंग यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर व विकासमुखी धोरणांवर विश्वास ठेवून भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. करण दादा देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या प्रवेशावेळी वरोरा चे शहराध्यक्ष श्री. संतोष पवार तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून, भद्रावती-वरोरा परिसरात भाजपाच्या कार्याला आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
🟧 “सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आणि पक्षाच्या विचारधारेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
—🙏 जय विदर्भ 🙏—
— ✍️ वार्ताहर




