🟠 वरोरा भाजपा परिवारात नवे सदस्य – विकास परचाके यांचा भाजपा प्रवेश 🟠
वरोरा : अभिषेक भागडे –
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण दादा देवतळे साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवीय प्रभाग क्रमांक एक, वरोरा येथील विकास परचाके आणि अर्चना विकास परचाके यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
या प्रवेशावेळी वरोरा शहर भाजपा अध्यक्ष संतोष पवार आणि भद्रावती ग्रामीण अध्यक्ष श्यामभाऊ उरकडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी माहिती देताना सांगितले की, “आमदार करणदादा देवतळे साहेब यांच्या कार्यशैली, लोकाभिमुख नेतृत्व व जनसंपर्कामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून अनेक नागरिक स्वेच्छेने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहेत.”
भविष्यातही अनेक नागरिक आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
🟢 भाजपाचे वाढते जनाधार आणि आमदार करणदादांचे सक्षम नेतृत्व वरोरा शहरात नवी ऊर्जा निर्माण करत आहे.
— -🙏जय विदर्भ🙏—




