filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; hdrForward: 6; shaking: 0.000000; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0006,0.0000; brp_del_sen: 0.1500,0.0000; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (12, 0);aec_lux: 258.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

📰 वरोरा भाजपा तर्फे नगरपरिषद निवडणूक 2025 संदर्भात बैठक संपन्न

अभिषेक भागडे  : वरोरा भारतीय जनता पार्टी तर्फे आज नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार श्री. करण देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 13 प्रभागातील  इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा घेण्यात आली.

बैठकीत प्रत्येक वार्डातील स्थानिक समस्या, नागरिकांच्या अपेक्षा तसेच विकासाच्या दृष्टीने आवश्यक योजनांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा व कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी श्री. रमेश राजुरकर (निवडणूक प्रमुख वरोरा–भद्रावती), सौ. लीलाताई बोंडे (शहर महिला अध्यक्ष), श्री. संतोष पवार (शहराध्यक्ष) यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आमदार करन देवतळे यांनी सांगितले की, “वरोरा नगरपरिषदेतील प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विकास, पारदर्शकता आणि नागरिकसेवेच्या बळावर उतरणार असून, आगामी निवडणुकीत पक्ष निश्चित विजयी होईल.”

👉 बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रभागानुसार विषयवार चर्चा, स्थानिक पातळीवरील अडचणींचा आढावा आणि निवडणूक नियोजनाची दिशा याबाबत खुला संवाद झाला.

—🙏 जय विदर्भ🙏—