
📰 वरोरा : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन 🇮🇳
आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी देशाच्या एकता व अखंडतेचे प्रतीक, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि महान स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने वरोरा पोलीस विभागातर्फे तथा शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा लोकमान्य विद्यालय येथून मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
यामध्ये पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच लोकमान्य महाविद्यालयातील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेली देशभक्तीपर घोषणा आणि राष्ट्रप्रेम जागवणारे फलक.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी तर्फे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण दादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच रमेश जी राजुरकर (वरोरा-भद्रावती निवडणूक प्रमुख), भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, भा.ज.यु.मो. तालुका महामंत्री उमेश माहुरे (जरुर खटी ग्रामपंचायत सदस्य) व अन्य आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस विभागातर्फे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले असून, कार्यक्रम शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक पार पडला.
जय हिंद! 🇮🇳
🙏 जय विदर्भ! 🙏
अभिषेक किशोर भागडे,वरोरा मो. नं. 96 73 57 47 11



