गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीचे शिल्पकार,भाजपा किसान मोर्चाचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष,राज्याचे पूर्व अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री,चिमूर लोकसभा क्षेत्राचे पूर्व खासदार तथा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व ज्यांनी केले असे पूर्व आमदार,रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक , जनसंघ ते भाजपा असा प्रवास करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा.महादेवराव शिवणकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.गोंदिया भंडारा जिल्ह्यात भाजपा च्या पायाभरणीत ज्यांची मोलाची भूमिका होती त्यापैकी एक म्हणजे सगळ्यांचे परिचित दादा अर्थात महादेवराव जी शिवणकर… दादाच्या जाण्याने एक मोठा मार्गदर्शक भाजपा परिवाराने गमावला. आज भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व करणारी स्थानिक नेत्याची जी पिढी दिसते त्यांचे श्रेय श्रद्धेय दादांचे. राजकारणातून निवृत्त होऊन आध्यात्मिकतेत रममाण झालेल्या दादांचे योगदान गोंदिया आणि भंडारा जिल्हा कधीही विसरणार नाही. गोंदिया जिल्ह्याचे दादा प्रा. महादेवराव जी शिवणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच कामना. 🙏 जय विदर्भ 🙏




