(कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे उपबाजार आवार चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ ) कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे उपबाजार आवार चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ आज दिनांक 17 /10 /2025 रोज शुक्रवार ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्रभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व भद्रावती -वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री.करण संजय देवतळे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती श्री. राजेंद्र गजानन डोंगे उपसभापती सौ. अश्लेषा मं. भोयर( जीवतोडे ) उपस्थित होते. याप्रसंगी सोयाबीन विक्रीसाठी आणल्याबद्दल पारोधी येथील शेतकरी रामदास रामटेके, विठ्ठल जीवतोडे चंदनखेडा, वामन विरुटकर पारोधी यांचा शाल श्रीफळ व ग्रामगीता भेट देऊन मा. आ. श्री .करण संजय देवतळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक गजानन उताने,मनोहर आगलावे ,कान्होबा तिखट, अनिल चौधरी, शरद जांभुळकर, राजू आसुटकर , शांताबाई रासेकर, भानुदास गायकवाड , प्रविण बांदुरकर,अतुल जिवतोडे बाजार समितीचे सचिव श्री. नागेश पुनवटकर तसेच व्यापारी भरत तेला ,प्रभाकर घोडमारे ,विकास मगरे, उद्धव भागवत, प्रमोद खिरटकर माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड, मुधोलीचे सरपंच बंडू नन्नावरे, दयानंद जांभुळे, लटारी रासेकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी विठ्ठल टोंगे, विलास पालकर, राजपाल भागवत मापारी ईश्वर पोईनकर, अनिकेत सरोदे, यांनी सहकार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल उपबाजार आवार, चंदनखेडा येथे विक्रीस आणावा, असे संयुक्त आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. राजेंद्र डोंगे, उपसभापती सौ. अश्लेषा भोयर (जीवतोडे ) सचिव श्री.नागेश पुनवटकर यांनी केले आहे.




