Home Breaking News रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.

रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.

 

वरोरा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा आज वाढदिवस असून, राज्यावर आलेल्या दुष्काळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना व शुभेच्छुकांना इतर खर्च टाळून सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.याच धर्तीवर आज वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ८.३० वाजता रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरचे संस्थापक रवींद्र शिंदे हे सहकार क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक आणि जनहिताच्या योजना राबवल्या जातात. यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे मार्गदर्शन उपक्रम, श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सद्गुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना, ‘अनाथांची माई’ स्व. सिंदुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म. ना. पावडे क्रीडा स्पर्धा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना यांचा समावेश आहे.
या वर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्यांना मदत करून सशक्त समाजनिर्मितीसाठी हातभार लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानुसार, सकाळी १० वाजता भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने गरजू नागरिकांना मदत करण्यात आली. त्यावेळी निवडणूक प्रमुख वरोरा विधानसभा क्षेत्र तथा राज्य परिषद सदस्य भाजप महाराष्ट्र चे रमेश जी राजूरकर, वरोरा शहर अध्यक्ष संतोष
पवार, भाजपचे कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी, व भाजपचे सर्व आघाडी उपस्थित होते.