हिंदीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारचा यू-टर्न ?

हिंदीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारचा यू-टर्न ?
fadnavis-governments-u-turn-on-hindi-issue

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज, अर्थात सोमवार 30 जून पासून सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे सक्तीचे करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय केवळ शैक्षणिक बाबींशीच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक दबावांशी देखील संबंधित एक मोठे पाऊल मानले जात आहे, कारण राज्यातील शिवसेना आणि मनसेचे राज ठाकरे (Raj Thakrey) हा मराठी अस्मितेचा मुद्दा बनवन येत्या यांनी 5 जुलै रोजी मोर्चाचे आवाहन केले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच काळानंतर ठाकरे बंधू अर्थात उद्धव आणि राज ठाकरे या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येणाच्या शक्यतेमुळे राज्यात निर्माण झालेल्या वातावरणामुळे सरकारला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागला. सरकारच्या निर्णयानंतर, विरोधी पक्षांनी 5 जुलै रोजी मुंबईत होणारा मोर्चा रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि त्याला मराठी अस्मितेचा विजय म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी आता 5 जुलै रोजी विजय मार्च काढला जाईल अशी घोषणा केली.

राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) अंतर्गत त्रिभाषिक सूत्र लागू करून हिंदी सक्तीची करण्याची घोषणा केली होती, परंतु सततचे निषेध, विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला. त्यामुळे सरकारने 16 एप्रिल आणि 17 जून 2025 रोजी जारी केलेले दोन्ही सरकारी आदेश (GRs) रद्द केले आहेत. तसेच त्रिभाषा धोरणाबाबत पुढील पाऊल तज्ञ समितीच्या अहवालानंतरच ठरवले जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं.