लाडके भावोजी पुन्हा येणार! आदेश बांदेकरांकडून नव्या कार्यक्रमाचा ट्रेलर शेअर, कोणत्या चॅनेलवर दिसणार?

लाडके भावोजी पुन्हा येणार! आदेश बांदेकरांकडून नव्या कार्यक्रमाचा ट्रेलर शेअर, कोणत्या चॅनेलवर दिसणार?
ladke-bhavoji-will-be-back-aadesh-bandekar-shares-the-trailer-of-the-new-show-on-which-channel-will-it-be-shown

महाराष्ट्रभरातील सर्व वहिनींचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर झी मराठीवरील लोकप्रिया शो ‘होम मिनिस्टर’मुळे (Home Minister) घराघरांत पोहोचले. आदेश बांदेकर यांच्या या शोमध्ये पैठणीचा खेळ रंगायचा. कधी जावा-जावांमध्ये, कधी सासू-सुनेमध्ये तर, कधी मैत्रिणी-मैत्रिणींमध्ये हा खेळ खेळला जायचा आणि विजेत्या महिलेला नवी-कोरी पैठणी भेट म्हणून दिली जायची. ‘

होम मिनिस्टर’मध्ये फक्त महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण देशभरातील महिलांचा सन्मान करण्यात आला. तब्बल 20 वर्ष छोटा पडदा (Zee Marathi) गाजवणाऱ्या या कार्यक्रमानं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोचं सूत्रसंचलन आदेश बांदेकरांनी केलेलं. त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पेलली होती. अशातच आता आदेश बांधेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. फक्त यावेळी काही गोष्टी मात्र बदललेल्या असणार आहेत.

‘होम मिनिस्टर’नं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मात्र आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) छोट्या पडद्यापासून दूरच गेले. ते कोणत्याही मालिकेत किंवा शोमध्ये दिसलेच नाही. पण, आता लवकरच ते छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळत आहे. आदेश बांदेकरांचा नवाकोरा शो झी मराठीवर नाहीतर स्टार प्रवाहवर येणार आहे. स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया हँडलवरुन या नव्याकोऱ्या शोची नुकतीच घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये आदेश बांदेकर दिसत नसले तरीही त्यांचा आवाज ऐकू येत आहे. या प्रोमोला आदेश बांदेकरांनी व्हॉईल ओव्हर दिला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं स्टार प्रवाहवर रोज संध्याकाळी सहा वाजता हा शो पाहायला मिळणार आहे.