ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर ‘सिंदूर वन’ पार्क बांधले जाणार, काय असतील वैशिष्ट्ये ?

ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर ‘सिंदूर वन’ पार्क बांधले जाणार, काय असतील वैशिष्ट्ये ?
ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर ‘सिंदूर वन’ पार्क बांधले जाणार, काय असतील वैशिष्ट्ये ?

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच पाकिस्तानचे अनेक हवाई तळही उद्ध्वस्त केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा झाली.

भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) यशानंतर आता या धर्तीवर एक पार्क बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्कचे नाव सिंदूर वन असे असणार आहे. हे पार्क गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बांधले जाणार आहे. या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. त्याच ठिकाणी या पार्कची उभारणी केली जाणार आहे.

गुजरातमधील कच्छमध्ये पाकिस्तान सीमेजवळ हे पार्क बांधले जाणार आहे. या पार्कबद्दल माहिती देताना मुख्य वनसंरक्षक संदीप कुमार यांनी म्हटले की, हे पार्क आठ हेक्टरमध्ये बांधले जाणार आहे. या पार्कला ‘सिंदूर वन’ असे नाव देण्यात येणार आहे. या पार्कमध्ये सेना, नौदल, हवाई दल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) या भारतीय सशस्त्र दलांना समर्पित विविध विभाग असणार आहेतॉ. भुज शहराजवळील मिर्झापूर गाव या उद्यानासाठी निवडण्यात आले आहे.