Home विदर्भ नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार

नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार

नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार
नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार

नागपूर (Nagpur) :- जरीपटक्यातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या २१ पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेची आणि ठेवीदारांची ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून जरीपटका पोलिसांनी संस्थेच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शशिकांत नारनवरे (व्यवस्थापक), महेंद्र जनार्दन राऊत (अध्यक्ष), संजय दशरथ गजघाटे (उपाध्यक्ष), रवींद्र धर्मदास मेश्राम (संचालक), दुर्योधन डहारे, भगवा विठुजी नन्नावरे, गौतम दौलत गेडाम, राजेश पुरुषोत्तम मांजरे, नरेंद्र नामदेव शेंडे, अचल मनुराज रामटेके, मिलिंद नामदेव लांजेवार, प्रमोद देवदास वासनिक, प्रवण रामचंद्र मेश्राम, संजय माणिक जयस्वाल, विरंशकुमार वरखेडे, मनोज भीमराव गजभिये, छाया मधुकर मेश्राम (संचालिका), संगीता संजय थुल, नंदिनी अजयकुमार गौतम, स्वीकृत को ऑप. संचालक नरेश सोमकुंवर आणि प्रदीप मेश्राम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.