Home महाराष्ट्र यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम ?

यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम ?

यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम ?
the-old-crop-insurance-scheme-will-be-implemented-from-this-year-how-much-premium-will-farmers-have-to-pay

कृषीमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावर्षीपासून राज्यात जूनी पीक विमा योजना होणार लागू होणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2 टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे.

पीक विमा योजनेवरुन (Crop Insurance Scheme) सातत्यानं आरोप प्रत्यारोप देखील होत होते. शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत मिळत नसल्याची ओरड केली जात होती. अशातच कृषीमंत्री कोकाटे यांनी जुनी पिक विमा योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्ता शेतकऱ्यांना 2 टक्के हप्ता भरकावा लागणार आहे. यामुळं गैरप्रकाराला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही बदल केलीची माहिती कोकाटे यांनी दिली आहे.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 53 वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला देखील कोकाटे यांनी दिला आहे. पीक विम्याबाबत बैठक घेवून प्रश्न सोडवणार असल्याचेही ते म्हणाले. यंदा मे मध्येच पाऊस होतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धोरण तयार करणार असल्याचे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले.