Home जिल्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
prime-minister-narendra-modi-will-address-the-nation-at-8-pm-tonight

 

India Pakistan Updates भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला. दरम्यान सैन्यदलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं उत्तर मिळेल असंही सांगितलं, आता पाकिस्तानला माफी मिळणार नाही असं जे.डी. व्हान्स यांना मोदींनी सांगितलं आहे.

दरम्यान आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) , विरोधकांनी केलेली विशेष अधिवेशनाची मागणी, सैन्यदलांची कारवाई, डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आणि त्यानंतर झालेला शस्त्रविराम या सगळ्याबाबत काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे.