Home जिल्हा कंटेंट क्रिएटर मीशा अग्रवाल हिचे २५ व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी निधन

कंटेंट क्रिएटर मीशा अग्रवाल हिचे २५ व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी निधन

कंटेंट क्रिएटर मीशा अग्रवाल हिचे २५ व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी निधन
content-creator-misha-agarwal-passes-away-a-few-days-before-her-25th-birthday

नवी दिल्ली (New Delhi) :- लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर मीशा अग्रवाल यांचे तिच्या २५ व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी दुःखद निधन झाले. त्या २४ वर्षांच्या होत्या.

कंटेंट क्रिएटर मीशा अग्रवाल यांचे २५ व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच निधन झाले आहे. तिच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. तिच्या मृत्यूचे कारण उघड झालेले नाही.

शुक्रवारी रात्री, मीशाच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली ज्यामुळे तिच्या सर्व फॉलोअर्सना धक्का बसला. पोस्टची सुरुवात तिच्या नावाने झाली, “मीशा अग्रवाल”, त्यानंतर “२६ एप्रिल २००० – २४ एप्रिल २०२५”, असे लिहिले होते की, आज तिच्या २५ व्या वाढदिवसाच्या फक्त दोन दिवस आधी तिचे निधन झाले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “मीशा अग्रवालच्या निधनाची हृदयद्रावक बातमी आम्ही जड अंतःकरणाने शेअर करत आहोत. तुम्ही तिला आणि तिच्या कामाला दाखवलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. आम्ही अजूनही या प्रचंड नुकसानातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत.”

New Delhi population
New Delhi Railway Station
New Delhi map
New Delhi Pin Code
Is New Delhi a state
Flights to New Delhi
Capital of Delhi
Delhi new mayor