Home Breaking News गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा ‘हे’ हटके शुभेच्छा...

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा ‘हे’ हटके शुभेच्छा संदेश

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
give-special-marathi-wishes-to-your-loved-ones-on-the-auspicious-occasion-of-gudi-padwa-send-these-unique-greeting-messages

दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपेकी एक म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. त्यानुसार यंदा गुढीपाडव्याचा सण 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून घरावर गुढी उभारली जाते. तसेच, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, घराला चांगले आरोग्य लाभावे आणि येणारं नवं वर्ष आनंदात आणि सुखात जावं यासाठी प्रार्थना केली जाते. आणि सण समारंभ म्हटला की नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देणं आलंच. तुम्हीही घर बसल्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना गुढीपाडव्याचे संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता, त्यासाठी काही शुभेच्छा संदेश.

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट…
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा-आकांशा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa 2025
Gudi Padwa festival which state
Gudi padwa meaning
Gudi padwa in english
Gudi Padwa how it is celebrated
gudi padwa is celebrated on which day?
Gudi Padwa food
gudi padwa is celebrated during which season?