Home महाराष्ट्र मराठी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने मनसेचा संताप

मराठी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने मनसेचा संताप

MNS angered over Marathi film not being given censor certificate
Mumbai chart Mumbai Indian Mumbai dharavi fire Mumbai City Mumbai choufer Mumbai Map Mumbai Pin Code Mumbai weather

मुंबई (Mumbai) :- मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज अचानक मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात धडक दिली. ‘मी पाठीशी आहे’ या मराठी चित्रपटाला प्रदर्शनसाठी अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर अमेय खोपकर यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.

मी पाठीशी आहे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट स्वामी समर्थांवर आधारित आहे. येत्या सोमवारी २८ मार्चला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी निर्मात्यांची योजना होती. मात्र, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माते मयूर खरात यांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमेय खोपकर हे आज मयूर खरात यांच्यासह सेन्सॉर बोर्डाच्या (MNS) कार्यालयात पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना एकही जबाबदार अधिकारी जागेवर आढळला नाही. यामुळे संतप्त झालेल्या अमेय खोपकर यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.

मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असणं गरजेचं

यानंतर अमेय खोपकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “येत्या २८ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला (Raj THakeray) अजिबात मदत मिळाली नाही. निर्मात्याने सेन्सॉर बोर्डाने सांगितल्यानुसार सर्व कागदपत्रे तयार करुन सादर केली, तरीदेखील गेल्या ८ दिवसांपासून त्याला सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालयात बसवून ठेवलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावर त्यांना साधे उत्तर द्यायला एकही शिपाई या ठिकाणी उपलब्ध नाही”, असे अमेय खोपकर म्हणाले.

Mumbai chart
Mumbai Indian
Mumbai dharavi fire
Mumbai City
Mumbai choufer
Mumbai Map
Mumbai Pin Code
Mumbai weather