Home महाराष्ट्र संतोष देशमुख यांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक-उज्ज्वल निकम

संतोष देशमुख यांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक-उज्ज्वल निकम

संतोष देशमुख यांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक-उज्ज्वल निकम
the-murder-of-santosh-deshmukh-is-a-very-serious-matter

सुनावणीनंतर उज्ज्वल निकमांनी दिली माहिती

नवी दिल्ली (New Delhi) :- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी मकोका न्यायालयात सुरु झाली. या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयासमोर हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. खंडणी, हत्या प्रकरणाची तारखेवार कोर्टात माहिती दिली.

वाल्मिक कराडची खंडणीसाठी मागणी, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा क्रम कशाप्रकारे एकमेकांशी संबंधित आहे हे न्यायालयात सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यावर हा खटला आधारित आहे. संपूर्ण हत्याप्रकरण गुन्हेगारी कटाचं आहे. एसआयटीने केलेला तपास आणि त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे अतिशय चांगले आहेत असंही उज्वल निकम म्हणाले.

एकूणच हा कट कसा शिजला हे न्यायालयाला सांगितले. प्रत्येक तारखेनुसार आमच्याकडे पुरावा आहे. विशेषत: ज्यांनी धमकी दिली, गँग लिडर घटनास्थळी प्रत्यक्ष आला या सर्व गोष्टी सरकारपक्षाकडे व्हिडिओ-ऑडिओ स्वरुपात आहे. हा कट दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा मिळून आहे. यातील आरोपी कसे दोषी आहेत हे न्यायालयाला आम्ही सांगितले असंही उज्वल निकम म्हणाले.
यातील काहींची संपत्ती या संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी अशी न्यायालयाला विनंती केली. त्यानुसार न्यायालयाला आम्ही अर्ज सुद्धा केला असल्याचं उज्वल निकम (Ujjval Nikam) म्हणाले.

New Delhi population
New Delhi Railway Station
New Delhi Map
New Delhi Pin Code
Is New Delhi a state
Flights to New Delhi
New Delhi areas list
delhi is in which state? – quora