Mahakumbh2025 : राष्ट्रपतींनी केले संगमात स्नान

Mahakumbh2025 : राष्ट्रपतींनी केले संगमात स्नान
mahakumbh2025-presidents-banana-confluence-bath

प्रयागराज (Prayagraj) 10 फेब्रुवारी :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, सोमवारी प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. यासोबतच त्यांनी संगमावर पूजा आणि गंगा आरती देखील केली. पवित्र संगमावर स्नान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाकुंभमेळ्याचे अजून 17 दिवस शिल्लक आहेत. राष्ट्रपती प्रयागराजमध्ये दाखल झाल्यानंतर महापौर उमेश चंद्र गणेश केसरवानी यांनी मुर्मू यांचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रपतींनी संगमानवर पूजा-अर्चना आणि गंगा आरती केली. याप्रसंगी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. प्रयागराजमध्ये आज सकाळी 8 वाजेपर्यंत महाकुंभात 10 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. महाकुंभ सुरू झाल्यापासून 9 फेब्रुवारीपर्यंत 43.57 कोटींहून अधिक लोकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे.

Prayagraj jam
Prayagraj old name
Prayagraj crowd
Prayagraj famous for
Prayagraj Pin Code
Prayagraj meaning
Why was Allahabad name changed to Prayagraj
Prayagraj Map