राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

 राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
case-filed-against-rahul-gandhi

नवी दिल्ली 27 जानेवारी (New Delhi) :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २३ जानेवारी रोजी सोशल मीडियावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करणारी पोस्ट केली.या पोस्टवर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२३ जानेवारी २०२५ रोजी राहुल गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करणारी पोस्ट केली. या पोस्टमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल महासभेने आक्षेप घेत राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिली होती.त्यानंतर याप्रकरणी दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते ( राहुल गांधी )यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी जी पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाल्याचा उल्लेख केला आहे. याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान ताइहोकू (आता ताईपे, तैवानची राजधानी) येथे दुर्घटनाग्रस्त झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला, याबद्दल निश्चित माहिती नाही. ते बेपत्ता झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या आयोगालाही त्यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल निश्चित माहिती मिळाली नाही. अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधींच्या पोस्टवर आक्षेप घेत भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, “राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहे, ज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आधी काँग्रेस आणि नंतर देश सोडायला भाग पाडले. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने नेहमीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे.”

तसेच या पोस्टमुळे राहुल गांधी यांच्यावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही टीका केली आहे. ही ती संघटना आहे, जिची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपनेही राहुल गांधींवर या पोस्टवरून टीका केली आहे.

New Delhi population
New Delhi Railway station
New Delhi Pin Code
Flights to New Delhi
Where is Delhi located in which state
delhi is in which state? – quora
Capital of India before Delhi
New Delhi District