Jammu and Kashmir : सैन्य छावणीवर दहशतवाद्यांचा गोळीबार

Jammu and Kashmir : सैन्य छावणीवर दहशतवाद्यांचा गोळीबार
firing-of-terrorists-near-military-camp

जम्मू (Jammu) 25 जानेवारी:-  जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्यातील बिलावरमधील भातोडी आणि मुआर भागातील भारतीय सैन्याच्या छावणीवर शुक्रवारी रात्री जिहादी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. छावणीवर हल्ला करणाऱ्या जिहादींचा शोध घेण्यासाठई मोहीम सुरू असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

बीएसएफ वेस्टर्न कमांडचे एडीजी सतीश खंदारे यांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिनापूर्वी कठुआ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी बीएसएफ आउट पोस्ट बोबिया येथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सैनिकांचे मनोबल वाढवले. प्रजासत्ताक दिनी सैनिकांना बॉर्डरवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नद्या आणि नाल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले. बीएसएफने अलीकडेच जम्मू ते कठुआपर्यंत बोगदाविरोधी ऑपरेशन केले. त्यामुळे 33 किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीची शक्यता नाही.

Jammu directions
Flights to Jammu
Jammu distance
Jammu University
Jammu district
Mumbai vs jammu
Mumbai jammu ranji
Jammu neighborhoods