Home महाराष्ट्र चंद्रपूर टीटीसीतील दोन बिबट्यांना ‘बर्ड फ्लू’

चंद्रपूर टीटीसीतील दोन बिबट्यांना ‘बर्ड फ्लू’

चंद्रपूर टीटीसीतील दोन बिबट्यांना 'बर्ड फ्लू’
chandrapur-ttcs-two-children-suffering-from-bird-flu

चंद्रपूर (Chandrapur) 24 जानेवारी :- 

चंद्रपूर ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर (टीटीसी)मधील दोन बिबट्यांची ‘एच५एन१ एव्हियन फ्लू’ अर्थात बर्ड फ्लूची ‘सीरो’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भोपाळच्या आयसीएआर- एनआयएचएसएडी प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. दरम्यान त्यामुळे यांना हा आजार पूर्वी होऊन गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये जटायू प्रकल्पांतर्गत सोडण्यात आलेल्या तीन पांढऱ्या रंगाच्या गिधाडांचा विषाणूने मृत्यू झाला होता. त्यांच्या नमुन्यांमध्ये ‘एव्हियन इन्फ्लूएंझा’ म्हणजे बर्ड फ्ल्यू ने मृत्यू झाला आहे. या गिधाडांना फक्त एकदाच औषधीयुक्त चिकन दिले गेले असल्याने हा विषाणू जंगली स्त्रोतांमधून पसरण्याची शक्यता तज्ज्ञांची व्यक्त केली आहे.

दरम्यान या प्रकरणांचा नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये एच५एन१ च्या उद्रेकाशी संबंध असण्याची शक्यता ताडोबा अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. नागपुरात डिसेंबर २०२४ मध्ये तीन वाघ आणि एका प्रौढ बिबट्याचा मृत्यू झाला होता.

Chandrapur map
Chandrapur in which district
Chandrapur is famous for
Chandrapur in which state
ZP Chandrapur
Chandrapur Pin Code
Chandrapur area
Chandrapur history