Home जिल्हा RG Kar Hospital Case : रॉयच्या जन्मठेपेवर ममता बॅनर्जी नाराज

RG Kar Hospital Case : रॉयच्या जन्मठेपेवर ममता बॅनर्जी नाराज

RG Kar Hospital Case : रॉयच्या जन्मठेपेवर ममता बॅनर्जी नाराज
RG Kar Hospital Case : रॉयच्या जन्मठेपेवर ममता बॅनर्जी नाराज

मुर्शीदाबाद (Murshidabad) 20 जानेवारी :- कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या संजय रॉय यांला आज, सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.न्यायालयाच्या निर्णयावर असमाधानी असल्याचे स्पष्टपणे सांगत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

यासंदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही सर्वांनी फाशीची शिक्षा मागितली होती पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच मृत्युदंडाची मागणी करत होतो, परंतु न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले नसते आणि आमच्या हाती असते तर फाशीची शिक्षा खूप आधीच झाली असती असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता की, “कोलकाता पोलिसांकडून तपासाची जबाबदारी जबरदस्तीने काढून घेण्यात आली. जर तपास कोलकाता पोलिसांच्या हाती असता तर निश्चितच या प्रकरणातील दोषी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती असे त्यांनी सांगितले.

Murshidabad map
Murshidabad in which country
Murshidabad in which state
Murshidabad University
Murshidabad khabar
Murshidabad Pin Code
Murshidabad hotels
Murshidabad is famous for