डॉ. व्ही नारायणन इस्रोचे नवे प्रमुख

डॉ. व्ही नारायणन इस्रोचे नवे प्रमुख
dr-v-narayanan-isros-ninth-chief

नवी दिल्ली (New Delhi) 8 जानेवारी :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.केंद्र सरकारने मंगळवारी याबाबतची घोषणा केली. याशिवाय व्ही नारायणन यांच्याकडे अंतराळ सचिव पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ त्यांची जागा व्ही नारायणन १४ जानेवारीला पदाची सूत्रे हाती घेतील.

डॉ.एस. सोमनाथ (Dr.S. Somnath) हे त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. ३ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर आता डॉ.व्ही.नारायणन यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.व्ही नारायणन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. सध्या ते वलियमाला इथल्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरचे संचालक आहेत. वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या नारायणन यांच्याकडे अंतराळ क्षेत्रातला ४० वर्षांचा अनुभव आहे. ते रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनचे तज्ज्ञ आहेत. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरच्या संचालक पदाच्या संपूर्ण कार्यकाळात डॉ.व्ही.नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित करण्यात आले आहेत. डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोमधील जेष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जवळपास चार दशके इस्रोत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे.

व्ही नारायणन यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचं प्रकल्प संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली C25 स्टेज यशस्वीपणे विकसित केलं गेलं. या बरोबरच डॉ.व्ही.नारायणन यांनी आदित्य अंतराळयान आणि GSLV Mk-III मिशन्स आणि चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ च्या मोहिमेमध्ये देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय असून त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता इस्रोला पुढे जाण्यास महत्वाची ठरणार आहे.

ISRO Chairman
ISRO live
Isro docking
ISRO full form
ISRO Wikipedia
ISRO Careers
Isro chairman v narayanan
ISRO Chairman List