आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, अमित शाहांचं वक्तव्य

आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, अमित शाहांचं वक्तव्य
taking-ambedkars-name-has-become-fashionable-amit-shahs-statement

पुणे (Pune) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  लोकसभेत बोलताना आंबेडकरांचं नाव घेत एक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे. आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन सध्या झाली आहे असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं, त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना हे वक्तव्य केलं होतं, त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. आंबेडकर आंबेडकर इतकं नाव देवाचं घेतला असता तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडिया एक्स वरती पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे.

“आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले.मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्या मुळे त्यांचे नाव फैशन म्हणून घेतले जात नाही तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन घेतले जाते .देवाचे नाव घ्यायचा अधिकार कुठे होता आम्हाला .तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवले होते अगदी स्पष्ट जे दिले ते भीमानेच”.

Pune map
Pune Pin Code
Pune district Name
Pune temperature news
Pune city area
Pune city area in sq km
Pune area in acres
Pune comes in which zone east or west