मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब

मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा उद्या नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

अशातच महायुतीच्या मंत्रिमंडळाची यादी संदर्भात महत्वाची माहीती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी आता दिल्लीदरबारी गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केवळ औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रीपद रिक्त ठेवले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Mumbai to
Bus accident mumbai
Mumbai choufer
Mumbai map
Mumbai City
Mumbai Chart
Mumbai population
Mumbai district Name