Home विदर्भ लोकवाहिनी आता दैनिक स्वरूपात

लोकवाहिनी आता दैनिक स्वरूपात

लोकवाहिनी आता दैनिक स्वरूपात
lokvahani-now-in-daily-format

पहिला अंक श्रीचरणी अर्पण

नागपूर (Nagpur) :मागील तेरा वर्षांपासून वाचकांच्या सेवेत असलेले साप्ताहिक लोकवाहिनी आता दैनिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. दैनिक लोकवाहिनीचे लोकार्पण 12 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. याप्रसंगी दैनिक लोकवाहिनीने तयार केलेल्या २१० पानी शुभारंभ विशेषांकाचे देखील प्रकाशन झाले.

दैनिक लोकवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. प्रवीण महाजन यांच्या हस्ते दैनिकाचा पहिला अंक टेकडी येथील श्री गणेशाच्या चरणी अर्पण करून या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वर्धा रोडवरील साईबाबा मंदिरात तसेच रामनगर येथील राम मंदिरात दर्शन घेऊन अंक प्रभूचरणी अर्पण करण्यात आला.

या खास प्रसंगी लोकवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. प्रवीण महाजन, कार्यकारी संपादक सुनील कुहीकर, प्रतिक महाजन, तसेच संपादकीय, जाहिरात, वितरण आणि डिजिटल विभागातील मनीषा पाठक, विजय गावंडे, विनायक पुंड, देवनाथ गंडाटे, संजय कडवे, आश्लेषा भट, रश्मी पाली व अन्य सहकारी उपस्थित होते.

डॉ. प्रवीण महाजन यांनी या ऐतिहासिक प्रसंगी उत्कट भावना व्यक्त करताना सांगितले की, “तेरा वर्षांपूर्वी 12 डिसेंबर रोजीच साप्ताहिक स्वरूपात लोकवाहिनीचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. वाचक आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे आज साप्ताहिकाने दैनिकात रूपांतरित होण्याचा मान मिळाला आहे.” त्यांनी सर्व वाचक, जाहिरातदार, वितरण एजंट आणि हितचिंतकांचे आभार मानले.

दैनिक लोकवाहिनीच्या या नव्या प्रवासाबद्दल वाचकांनीही भरभरून शुभेच्छा दिल्यात.

Nagpur today
Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
NMC Nagpur
Nagpur which state
Index number for property tax NagpurNMC Nagpur property tax receipt
Nagpur city population