Home Breaking News डॉ. प्रवीण महाजन यांचा जागतिक सन्मान

डॉ. प्रवीण महाजन यांचा जागतिक सन्मान

डॉ. प्रवीण महाजन यांचा जागतिक सन्मान
डॉ. प्रवीण महाजन यांचा जागतिक सन्मान

बाकू (अझरबैजान): लोकमत वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स 2024 अंतर्गत लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड डॉ. प्रवीण महाजन यांना पाणी व पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रदान करण्यात आला. हा सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी बाकू येथील प्रसिद्ध फेअरमाउन्ट हॉटेल फ्लेम टॉवर येथे संपन्न झाला. डॉ. महाजन यांचे जल संवर्धन, व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील कार्य जागतिक स्तरावर गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना क्रिकेटपटू व समालोचक नवज्योत सिंग सिद्धू, अभिनेत्री टिस्का चोप्रा आणि अनेक उद्योजकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. महाजन यांनी जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या संशोधनातून विविध पाणीप्रदूषण समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाय सापडले आहेत. या मान्यतेमुळे त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख मिळाली आहे. संपूर्ण सोहळा भव्य आणि प्रेरणादायी ठरला, ज्यामध्ये विविध देशांतील तज्ज्ञ, उद्योजक, आणि समाजसेवकांनी सहभाग घेतला.