Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी

एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी

एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी
eknath-shinde-realized-the-danger-and-demanded-the-post-of-home-minister

अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार

पुणे (Pune) :- भाजपकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल. पंकजा मुंडे यांना भाजप मुख्यमंत्री करु शकेल. त्यांचा अनुभव आहे. त्या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांनादेखील संधी मिळु शकेल, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. एकनाथ शिंदे यांना धोक्याची जाणीव झाली आहे, त्यामुळे ते गृहमंत्री पद मागत आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवले पाहिजे. मात्र, भाजपच ते ठरवताना दिसते आहे. भाजपला फॉर असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना मंत्रिपद मिळेल, असेही रोहित पवार यांनी म्हटले. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला. आपल्या पक्षात कोण मंत्री व्हावं ते ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाचा असतो. मात्र, या ठिकाणी सगळं काही भाजपचे दिल्लीतले नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शत प्रतिशत भाजपच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 88.06 टक्के आहे. तर महायुतीचा एकत्रित स्ट्राईक रेट 81 टक्के राहिला आहे. लोकसभेला 30 टक्यांच्या आसपास होता. भाजपने 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील 95 निवडून आले. लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच लाभ या निवडणुकीत भाजपला झाला.भाजपचे उमेदवार होते तिथे 10 टक्यांचा लाभ ईव्हीएम मध्ये फेरफार करुन झाला असल्याचे दिसते. ⁠तर, अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार होते तिथे 8 टक्के फेरफार झाल्याचे दिसत आहे.

What is Pune famous for
Pune district Name
Pune map
Ed sheeran pune
Pune city area
Pune city area in sq km
Pune area in acres
Pune population in Crores